साकीनाका बलात्कार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आदेश

 

मुंबईत निर्भया घटनेची पुनरावृत्ती करणारी संतापजनक घटना घडली असून ३० वर्षीय महिलेवर बलात्कार करुन आरोपींनी गुप्तांगात रॉड घुसवल्याचा अमानवीय आणि संतापजनक प्रकार केल्याचं समोर आला आहे. या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. तत्पूर्वी सदर महिलेचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत फास्ट ट्रॅकवर हा खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. दरम्यान, मुंबईतील न्यायालयाने आरोपी मोहन चौहानला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणे हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील यासंदर्भात बोललो आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

या घटनेविषयी मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण माहिती घेतली असून त्यांनी यासंदर्भात पोलीस आयुक्तांशी चर्चा केली आहे. झालेली घटना निंदनीय असून हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच या प्रकरणी तातडीने तपासाला गती देण्याचे निर्देश देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Team Global News Marathi: