गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा!

 

केंद्राची भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना राज्य-राज्यांमध्ये येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे फेरफार होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. खुद्द विजय रुपाणी यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली आहे.

रूपांनी म्हणाले की, गुजरातच्या जनतेनं आजवर दाखवलेल्या विश्वासाचे आणि भाजपाचे आभार व्यक्त करतो. माझ्या राजीनाम्यामुळे पक्षात नव्या चेहऱ्यांना संधी व जबाबदारी मिळेल, असं रुपाणी यांनी यावेळी म्हटलं आहे. तसेच यावेळी रुपाणी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आजवर केलेल्या मार्गदर्शनाबाबत आभार व्यक्त केले.

तसेच जनतेनं आजवर दिलेल्या प्रेमाचा कायमस्वरुपी ऋणी राहीन असंही रुपाणी म्हणाले. कोविड काळात माझ्या नेतृत्त्वात आम्ही राज्यात दिवसरात्र काम करुन नागरिकांची सेवा केली याचं समाधान असल्याचंही ते म्हणाले. यापुढील काळात पक्षाच्या कामात स्वत:ला व्यग्र ठेवण्याची इच्छाही रुपाणी यांनी बोलून दाखवली आहे.

Team Global News Marathi: