करुणा मुंडे यांच्या सांताक्रुज येथील घरात बीड पोलीस दाखल !

 

मुंबई | करून उंडे यांनी काही दिवसापूर्वी बीड येथे पत्रकार परिषेद येऊन खळबळजनक कुणास करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र त्यापूर्वीच त्यांच्या गाडीत हत्यार मिळाल्यामुळे पोलिसांनी करुणा मुंडेंसह गडाच्या चालकाला ताब्यात घेतले होते. आता त्या पाठोपाठ मुंबईमधील सांताक्रुझ येथील घरात बीड पोलीस दाखल झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. सध्या हे पथक सांताक्रुझ पोलीस ठाण्यात असल्याचेही समजते.

परळी दौऱ्यावर आलेल्या करुणा मुंडे यांच्यावर ५ सप्टेंबर रोजी जातिवाचक शिवीगाळ करून चाकूहल्ला केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटी व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद करण्यात आला. ६ सप्टेंबर रोजी करुणा शर्मा व त्यांच्यासोबत असलेल्या अरुण दत्तात्रय मोरे यांना अंबाजोगाई येथील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी करुणा मुंडे यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, तर गाडी चालक अरुण मोरे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

विशाखा रविकांत घाडगे यांच्या फिर्यादीनुसार, ५ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता त्या बेबी छोटूमियां तांबोळी यांच्यासह वैद्यनाथ मंदिरात दर्शनसाठी गेल्या होत्या. यावेळी करुणा मुंडे आणि अरुण मोरे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल अपशब्द काढत होते. याचा जाब विचारल्याने करुणा मुंडेंनी त्यांना जातिवाचक शिवीगाळ करत बेबी छोटूमियां तांबोळी हिच्या उजव्या हातास धरून खाली पाडले, तर अरुण दत्तात्रय मोरे याने चाकूने त्यांच्या पोटावर वार केला होता गाडीत आढळलेल्या पिस्तूलप्रकरणी करुणा मुंडे यांचा चालक दिलीप पंडित याच्यावर गुन्हा नोंद करुन त्यास अटक करण्यात आली.

Team Global News Marathi: