ऋतूराजच्या वाढदिवसानिमित्त सायलीच्या एका फोटोमुळं चर्चेला उधाण

 

‘काहे दिया परदेस’ या मालिकेतील अभिनेत्री म्हणजे सायली संजीव ही मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर अनेकांची मने जिंकली आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांपासून सायली संजीवचे नाव हे भारतीय क्रिकेट संघातील सलामीवीर ऋतुराज गायकवाडशी जोडले जात होते. त्यानंतर स्वत: सायलीने यावर प्रतिक्रिया दिली होती. मात्र आज पुन्हा एका व्हायरल फोटोमुळे सायली आणि ऋतुराज गायकवाड सोशल मीडियावर चर्चेत आले आहे.

भारतीय क्रिकेट संघातील सलामीवीर ऋतुराज गायकवाड काल आपला 26 वा वाढदिवस साजरा करत आहे. अशात अभिनेत्री सायली संजीवने सोशल मीडियावर केक कापतानाचा फोटो Insta वर शेअर केला आहे. यानंतर सायलीने ऋतुराजचा वाढदिवस साजरा केल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. सोशल मीडियावर सायलीचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मात्र सायली संजीव एका मुलाखतीमध्ये तिने ऋतुराज गायकवाडसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर वक्तव्य दिले होते की, “आमच्यात काहीच सुरू नाही. या अफवांमुळे आमच्यात जी मैत्री होती ती सुद्धा संपली आहे. मित्र म्हणून आम्ही एकमेकांशी बोलू शकत नाही. आमच्यात काहीच नव्हते. आमचे एकमेकांशी नाते का जोडले जात आहे हेही मला ठाऊक नाही” असे सायली म्हणाली. त्यानंतर एका फोटो नंतर सायली संजीव आणि ऋतुराज गायकवाड पुन्हा चर्चेत आले.

विशेष म्हणजेअभिनेत्री सायली संजीवचाही वाढदिवस आहे. अशात तिने केक कट करतानाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. त्यानंतर सायलीने ऋतुराजच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन केले आहे, अशा चर्चा सोशल मीडियावर चांगल्या रंगल्या आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून सायली आणि ऋतुराज यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू आहे.

 

Team Global News Marathi: