रिया चक्रवर्ती ड्रग्ज कनेक्शन, दोघांना मुंबईतुन अटक

रिया चक्रवर्ती ड्रग्ज कनेक्शन, दोघांना मुंबईतुन अटक

ग्लोबल न्यूज: सिने-अभिनेता सुशांत सिह राजपूत प्रकरणी आता नवे वळण लागले आहे. काही दिवसापूर्वी राजपूत प्रकरण सीबीआयकडे सुपूर्त करण्यात आले होते. सीबीआयने तपास सुरु केल्यांनतर या प्रकरणात अनेक खळबळजनक माहिती समोर आली. त्यानंतर रिया चक्रवर्ती आणि ड्रग्ज डिलर यांच्यात झालेल्या संभाषणातील माहिती आता समोर आली होती. या प्रकरणी झाईद आणि अब्देल बासित परिहार अशा दोन व्यक्तींना मुंबईतून तर फय्याज अहमदला याला गोव्यातून अटक करण्यात आली आहे.

झाईद हा बासित मार्फत शोवितच्याही संपर्कात होता. बशीत मार्फत शोविताच्याही संपर्कात होता. आता बशीत आणि शोवित एकमेकांना चांगल्याप्रकारे ओळखत असल्याची माहिती समोर आली आहे. या तिघांनाही एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे या रॅकेटमध्ये कोण-कोण सामील आहे याचा शोध सध्या सुरु आहे.

रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती याच्याशी संबंध असलेल्या नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने बुधवारी सकाळी बासित नावाच्या ड्रुग्स डिलरला अटक केली. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शोविक बासितकडून ड्रग्स खरेदी करीत असल्याचा आरोप केला जात होता. या अटकेमुळे यांच्याशी शोविकचे संबंध असल्यामुळे लवकरच रियलाही चौकशीसाठी बोलावण्यात येऊ शकते अशी माहिती मिळाली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: