तीन जणांकडून घराची रेकी, क्रांती रेडकर यांची सुरक्षेची मागणी

 

र्डेलिया क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी केलेल्या कारवाईत प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान याच्या मुलासह काही जणांना अटक करण्यात आली होती. मात्र दुसरीकडे या प्रकरणाला आता राजकीय वळण प्राप्त झालं असून राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियनवर अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. तसेच वानखेडे कुटुंबियांकडून सुद्धा या टीकेला सडेतोड उत्तर देण्यात आलेले आहे.

आता त्या पाठोपाठ वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी आपल्या कुटूंबाला धोका असल्याचे बोलून दाखविले आहे. तीन दिवसांपूर्वी काही लोकांनी आमच्या घराची रेकी केल्याचा दावा ही क्रांती रेडकर यांनी केला. आमच्या घराची रेकी केल्याचं सीसीटीव्ही फुटेज आम्ही पोलिसांना देणार आहोत, असंही त्यांनी म्हटलं आहे. आमच्या कुटुंबाला धोका असल्यानं आम्हाला सुरक्षा मिळणं गरजेचं असल्याची मागणी क्रांती रेडकर यांनी केली आहे.

काही दिवसांपूर्वी आमच्या घराजवळ तीन जण आले होते. त्या तिघांनी आमच्या घराची रेकी केली. या संदर्भातले सीसीटीव्ही फुटेज देखील आम्ही मिळवलं असल्याचे क्रांती रेडकर म्हणाल्या. आता ते सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देणार असल्याचंही त्या म्हणाल्या. वानखेडे कुटुंबीय रामदास आठवलेंच्या भेटीला समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर आणि वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली.

यावेळी रामदास आठवलेंनी समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांना आपलं समर्थन असल्याचं सांगत नवाब मलिक हे वानखेडे कुटुंबाची बदनामी करत असल्याचं म्हटलं आहे. रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं, नवाब मलिक हे समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांची बदनामी करत आहेत. वानखेडे कुटुंबीय मुस्लीम नाहीयेत. त्यांनी सर्व कागदपत्रे मला दाखवली आहेत. समीर वानखेडे यांच्यावर खोटे आरोप करण्यात येत आहेत. नवाब मलिक हे एनसीपी प्रवक्ते पदाचा गैरवापर करत आहेत. नवाब मलिक यांच्या जावयाला तरूगांत टाकले म्हणून ते हे सर्व करत आहेत असंही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

Team Global News Marathi: