माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आठवण काढताना राहूल गांधी झाले भाऊक

 

नवी दिल्ली | माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज पुण्यतीथी त्यांचा पुण्यातिथी निमित्त काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा दीदीला होता. इंदिरा गांधींची ज्या दिवशी हत्या झाली, केवळ त्याच्या काही तास आधी त्यांनी मला सांगितले होते की उद्या जर मला काही झाले तर तू डोळ्यातून अश्रु काढायचे नाहीत, रडायचे नाही अशी आठवण त्यांनी आज पुण्यतिथी निमित्त काढली होती.


राहुल गांधी यांनी आज इंदिराजींच्या पुण्यस्मरणाच्या निमीत्ताने एक व्हिडीओं जारी केला आहे. ज्या दिवशी माझ्या आजीवर अंत्यसंस्कार झाले तो दिवस माझ्या आयुष्यातील दुसरा अत्यंत अवघड दिवस होता असेही राहुल गांधी यांनी यात नमूद केले आहे. 1984 साली याच दिवशी खलिस्तानी समर्थक सुरक्षा जवानांनी इंदिराजींवर त्यांच्या निवासस्थानीच गोळ्या घालून त्यांची हत्या केली होती.

ते पुढे म्हणाले की, आपली हत्या होईल याची कल्पना त्यांना आधीच आली होती. त्या दिवशी सकाळीच माझ्याशी बोलताना मला काही झाले तर रडू नकोस असे त्या म्हणाल्या होत्या, त्यावेळी मला त्यांचे बोलणे नीट लक्षात आले नाही. आणि केवळ दोन-तीन तासांनंतर त्यांची हत्या झाली. देशासाठी काम करताना प्राण गमावणे याचा त्यांनी अभिमानच बाळगलेला आम्हाला जाणवले होते. मला दोन आई होत्या. त्यातील माझी आजी म्हणजे मला माझ्या आई सारखीच होती. माझे वडिल माझ्यावर रागवले की माजी आजी माझ्या मदतीला धावून यायची. आणि माझी दुसरी आई म्हणजे माझी खरीखुरी आई!.

Team Global News Marathi: