रवींद्र वायकर यांच्यावर 500 कोटी घोटाळ्यांचा सोमय्यांचा आरोप

 

महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून खाली आल्यानंतरही नेत्यांवर आरोपसत्र सुरूच आहे. ‘मुंबईतील महाकाली गुंफेमध्ये शिवसेनेचे नेते रवींद्र वायकर यांनी घोटाळा केला आहे.500 कोटींचा हा घोटाळा आहे. महाकाली गुंफेसाठी 500 कोटी बिल्डरला दिले, असा गंभीर आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन रवींद्र वायकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. तसंच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही घणाघाती टीका केली आहे.

महाकाली गुंफेमध्ये रवींद्र वायकर यांनी घोटाळा केला आहे. 500 कोटींचा हा घोटाळा आहे. महाकाली गुंफेसाठी 500 कोटी बिल्डरला दिले आणि या बिल्डरांमध्ये अविनाश भोसले, शाहिद बलवा आणि विनोद गोयंका यांचा समावेश आहे. उद्धव ठाकरेंचा उजवा हात संजय राऊत जेलमध्ये डावा हात अनिल परब रिसॉर्ट तुटणार आहे तर तिसरा हात वायकर घोटाळा केला आहेस अशी टीका सोमय्यांनी केली.

उद्धव ठाकरे यांच्या घोटाळ्याचे स्मारक आहे त्यासाठी काल मी दापोलीला गेलो होतो. एका बाजूला उद्धव ठाकरे यांच्या घोटाळ्याचे स्मारक उद्ध्वस्त करायचे तर दुसरीकडे कडे हे लोक हिरव्या रंगात रंगले आहे. 1993 च्या ब्लास्टमधील अतिररक्याचे स्मारक करण्यात हे व्यस्त आहे. एकाबाजूला स्वतःच्या भ्रष्टाचाराचे स्मारक करायचे आहे तर दुसऱ्या बाजूला याकूबचे स्मारक देखील करत आहे.

Team Global News Marathi: