“राष्ट्रवादीनं काँग्रेसच्या पाठीत सुरा खुपसला”, नाना पटोलेंचा हल्लाबोल

 

गेल्या अडीच वर्षांपासून अनेक वाद होऊन देखील अद्याप सत्ता भोगत असलेल्यामहाविकास आघाडीमधील अंतर्गत वाद आता समोर येऊ लागले आहेत. नुकताच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर थेट पाठीत सुरा खुपसण्याचं काम केल्याचा आरोप केला आहे. आता नाना पटोले यांच्या या आरोपांमुळेपणा एकदा आघाडीत बिघाडी होण्याची सहायता वर्तवली जात आहे.

मात्र या आरोपांना कारणीभूत ठरली आहे गोंदिया जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती सभापतीपदाची निवडणूक. या निवडणुकीत पटोले विरुद्ध पटेल अर्थात नाना पटोले विरुद्ध प्रफुल्ल पटेल हा वाद पुन्हा एकदा उघड झाला. त्यामुळे नाना पटोलेंनी त्यावरून आपल्या ट्विटर हँडलवर खरमरीत शब्दांत ट्वीट केलं असून थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर पाठीत सुरा खुपसल्याचा आरोप केला आहे.

नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातत्याने कुरघोड्या सुरू असल्याचा आरोप केला आहे. “मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादी काँग्रेस ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पाठीत सुरा खुपसण्याचे काम करीत आहे. आमच्या विरोधात त्यांच्या कुरघोड्या सातत्याने सुरू आहेत. याचा जाब आम्ही त्यांना नक्कीच विचारू”, असं ट्वीट नाना पटोले यांनी केलं आहे. या पार्श्वभूमीवर या दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू होण्याची शक्यता आहे.

 

 

Team Global News Marathi: