रणवीर सिंगवर विम्याशिवाय आलिशान कार चालवल्याचा आरोप

 

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग अनेकदा वादात सापडतो. आता नुकताच रणवीर सिंग पुन्हा अडचणीत आला आहे. वास्तविक अभिनेता नुकताच मुंबई विमानतळावर त्याची अॅस्टन मार्टिन कार चालवताना दिसला होता, ही कार रणवीरने गेल्या वर्षी खरेदी केली होती.निळ्या रंगातील या लक्झरी कारची किंमत जवळपास 3.9 कोटी रुपये आहे.

मात्र, आता एका ट्विटर युजरने दावा केला आहे की, रणवीर सिंग जी कार चालवत आहे त्याचा इन्शुरन्स एक्सपायर आहे. रितम गुप्ता नावाच्या ट्विटर युजरने स्क्रीनशॉट शेअर करत लिहिले की, “मुंबई पोलीस रणवीर सिंगवर कडक कारवाई करा. तो काल विना विमा कार चालवत होता.”रणवीर सिंगच्या या लक्झरी कारचा विमा २८ जून २०२० रोजी संपला होता. अशा परिस्थितीत रणवीर विना विमा कार चालवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करत आहे.

युजरच्या या ट्विटला उत्तर देताना मुंबई पोलिसांनी लिहिले की, आम्ही वाहतूक शाखेला माहिती दिली आहे. मुंबई पोलिसांच्या या ट्विटवर लोक भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने पोलिसांना विचारले की, फक्त व्हीव्हीआयपी लोकांनाच इतकी सुविधा का मिळते? लोकांचा रोष पाहता रणवीर सिंग पुन्हा एकदा नव्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर रणवीर सिंग लवकरच आलिया भट्टसोबत रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात दिसणार आहे. करण जोहर दिग्दर्शित या चित्रपटात आलिया आणि रणवीरशिवाय धर्मेंद्र, शबाना आझमी, प्रीती झिंटा आणि जया बच्चन यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर, हिरू जोहर आणि अपूर्व मेहता यांनी केली आहे.

Team Global News Marathi: