राशिभविष्य ; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग -Today’s Horoscope 19 October 2022
बुधवार.
तारीख 19.10.2022
शुभाशुभ विचार- चांगला दिवस.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – दुपारी 12.00 ते 1.30
दिशा शूल- उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र- पुष्य 08.02पर्यंत नंतर आश्लेषा.
आजची चांद्रारशी – कर्क.
————————————–


मेष – शुभ रंग- लाल
आज तुम्हाला काही घरगुती प्रश्नात लक्ष घालणे आवश्यक आहे. आज वास्तु व वाहन खरेदीच्या मार्गातील अडचणी दूर होतील. प्रेम प्रकरणां पासून दूरच रहा. खेळाडूंना सराव वाढवावा लागेल.

वृषभ – शुभ रंग – राखाडी
आज गृहिणी घर स्वच्छतेचे मनावर घेतील. काहीजण सहकुटुंब प्रवासास निघतील. करण्यात प्रवासात आज नवे हितसंबंध निर्माण होणार आहेत वाणीत मात्र गोडवा असणे गरजेचे.

 

मिथुन- शुभ रंग – क्रीम
आज आर्थिक आवक मनाजोगती राहील. काही प्रिय पाहुण्यांचे घरी आगमन संभवते वाडीत मृदुता ठेवलीत तर अनेक अवघड कामे सोपी होतील. प्रवासात मात्र त्रास होईल.

कर्क – शुभ रंग – मोरपंखी (Today’s Horoscope 19 October 2022)
आजचा दिवस तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल आहे सर्व कामे विनायत ते पार पडतील विवाहित जीवनात आज मनपसंत स्थळाचे प्रस्ताव येतील. विरोधक नमते घेतील.

 

Pune news: अन्नपूर्णा प्रकल्प अंतर्गत बुधवारपेठेत पोषण आहार वाटप

सिंह – शुभ रंग – निळा
कौटुंबिक वाढत्या गरजा भागवताना थोडीफार तारेवरची कसरतच होईल .पण तुम्ही निभावून न्याल. काही जणांना अनपेक्षित पणे दूरचे प्रवास घडणार आहेत. घरात थोरांशी मतभेद होण्याची शक्यता आहे.

 

कन्या – शुभ रंग – केशरी
आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून तुमच्या काही अपुऱ्या स्वप्नांची पूर्तता होणार आहे. सकारात्मक राहून आजचा दिवस सत्कारणी लावा. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व असेल.

तूळ – शुभ रंग – गुलाबी
उच्च अधिकारी वर्गास अधिकार वापरण्याची वेळ येईल. नोकरीत बढती ची चाहूल लागेल. आज कर्तव्यासच प्राधान्य देणे गरजेचे आहे. अतिवस्त दिवस.

 

वृश्चिक – शुभ रंग – जांभळा
आज सज्जनांच्या सहवासात वैचारिक देवाण-घेवाण होईल. तुमचे विचार प्रगल्भ होतील. कार्यक्षेत्रात काही किरकोळ अडचणींचा सामना मात्र करावा लागेल.

धनु – शुभ रंग – सोनेरी
कार्यक्षेत्रात आज कोणतेही धाडसाची कामे टाळाच. आर्थिक व्यवहार मर्यादे पलीकडे नको. गोडबोल्या मंडळी पासून दूरच रहा. झटपट लाभाचा मोह टाळा मनावर संयम ठेवा.

 

मकर – शुभ रंग – डाळिंबी
कौटुंबिक जीवनात सुसंवाद असल्याने तुम्ही आज घराबाहेरही आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवू शकाल अडचणीच्या प्रसंगी आज पत्नीची खंबीर साथ राहील.

कुंभ – शुभ रंग – मरुन
क्षुल्लक वाटणाऱ्या कामातही ऐनवेळी काही अडचणी येतील. ध्येयप्राप्तीसाठी चालू असलेल्या तुमच्या अथक प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ नक्की मिळेल.

 

मीन – शुभ रंग – पिस्ता
कला क्षेत्रातील मंडळींना रसिक मनसोक्त दाद देतील. तरुण मंडळींच्या महत्त्वाकांक्षा वाढतील आज स्वतःचे छंद जोपासण्यासाठी वेळ व पैसा खर्च कराल.

श्री जयंत बाळकृष्ण कुलकर्णी
( ज्योतिष व वास्तु सल्लागार)
फोन 9689165424

ग्लोबल न्युज नेटवर्क: