राणेंच्या यात्रेचा शिवसेनेला फरक पडणार नाही, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

 

महाराष्ट्रातील भाजपचे चार केंद्रीय नेते सोमवारपासून महाराष्ट्रभर जन आशीर्वाद यात्रा काढणार आहेत. यामध्ये अनेक भागात नव्यानं झालेले केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या यात्रेचं नियोजन केले. लोकांशी संवाद साधण्यासोबतच केंद्रातील योजनांची माहिती देखील ते जनतेला देणार आहेत. त्यातच आज पासून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जन आशीर्वाद दौरा मुंबईतून सुरु होणार आहे. येणाऱ्या मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याकडे पहिले जात आहे.

आता राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेवर प्रथमच शविसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, एकनाथ शिंदे म्हणाले की, राणेंच्या यात्रेचा शिवसेनेला फरक पडणार नाही, असे शिंदे म्हणाले आहेत. ते आज पत्रकार माध्यमांशी बोलताना त्यांना पत्रकारांनी राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेसंदर्भात विचारल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली होती.

तसेच आज नारायण राणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाणार असल्याची माहिती आहे. राणेंना आम्ही बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊ देणार नाही, अशी भूमिका कालपर्यंत सेना नेत्यांनी घेतली होती. मात्र आज सेना आमदार सदा सरवणकर यांनी यांनी राणेंना स्मृतीस्थळावर जाण्यापासून आम्ही रोखणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

Team Global News Marathi: