बाळासाहेब ठाकरे त्यांना अभिवादन करताना नारायण राणे झाले भावुक

 

महाराष्ट्रातील भाजपचे चार केंद्रीय नेते सोमवारपासून महाराष्ट्रभर जन आशीर्वाद यात्रा काढणार आहेत. यामध्ये अनेक भागात नव्यानं झालेले केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या यात्रेचं नियोजन केले. लोकांशी संवाद साधण्यासोबतच केंद्रातील योजनांची माहिती देखील ते जनतेला देणार आहेत. त्यातच आज पासून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जन आशीर्वाद दौरा मुंबईतून सुरु झाला आहे.

त्यातच आज नारायण राणे यांच्यासह त्यांच्या दोन्ही पुत्रांनी आज छत्रपती शिवाजी पार्क येतेच शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मुर्ती स्थळाला भेट देऊन अभिवादन केले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राणे काहीसे भावुक झाले. ‘मला आशीर्वाद द्यायला बाळासाहेब आज हवे होते,’ अशा भावना राणे यांनी यावेळी व्यक्त केल्या.

यावेळी पत्रकार माध्यमांशी संवाद साधताना राणे म्हणाले की, ”बाळासाहेबांसमोर नतमस्तक झालो. मला आशीर्वाद द्यायला बाळासाहेब आज हवे होते. मला आयुष्यात जे काही मिळालंय ते साहेबांमुळंच. साहेबांमुळंच मी घडलोय,’ असं राणे म्हणाले. ‘आज साहेब असते तर मला म्हणाले असते तर डोक्यावर हात ठेवून मला आशीर्वाद दिला असता. ‘नारायण, तू असंच यश मिळव’ असं म्हणाले असते. आज ते नसले तरी त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे असं मी समजतो,’ असंही राणे म्हणाले.

 

Team Global News Marathi: