रामदेव बाबा म्हणाले भारत-पाक मॅच देशहितविरोधी, आता मलिक यांचे सडेतोड उत्तर

 

आज होणाऱ्या भारत-पाकिस्तान मॅच संदर्भात विविध प्रतिक्रिया उमटताना दिसून येत आहे. त्यातच योगगुरु रामदेव बाबा यांनी सध्याच्या स्थितीत भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचा सामना हा देशहितविरोधी आहे, असे वक्तव्य केल्यानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर आता अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी रामदेवबाबा यांच्यावर खोटक टीका केली आहेत. त्यांनी बाबा थांबा म्हणत मोदी है तो मुमकीन है असं उपहासात्मक ट्वीट केलंय.

योगगुरु रामदेव बाबा आज नागपुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी 24 ऑक्टोबर रोजी होणारा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ‘टी-२०’ सामना भारतीय राष्ट्रधर्माच्या विपरित आहे, असं मत व्यक्त केलं. त्यानंतर आता मलिक यांनी बाबाजी रुकीये ना मोदी है तो मुमकीन है अशी उपहासात्मक टीका केली आहे. देशात नरेंद्र मोदी पंतप्रधान असतील तर काहीही होऊ शकतं असं त्यांनी अप्रत्यक्षपणे म्हटले आहे.

 

रामदेव बाबा यांनी २४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान टी-20 सामन्यावर प्रतिक्रिया दिली. सध्याच्या स्थितीत भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचा सामना होणे भारत देशाच्या हिताविरुद्ध आहे. एकीकडे आतंकी खेळ आणि दुसरीकडे क्रिकेटचा खेळ सुरु आहे. या दोन्ही गोष्टी सोबत चालू शकत नाहीत, असे रामदेव बाबा म्हणाले.

Team Global News Marathi: