छगन भुजबळ शिवसेनेत असते तर नक्कीच सर्वोच्च स्थानी गेले असते

 

नाशिक | नाशिक महानगर पालिका निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधनी सुरु केली आहे त्यातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिक मनपाची जबाबदारी सोपवली असून सध्या त्यांचे नाशिक जिल्ह्यांमध्ये येणाऱ्या आगामी महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरे वाढले आहेत.

त्यातच राऊत यांनी पदाधिकार्यांशी चर्चा केल्यानंतर नाशिक येथे माध्यमांशी संवाद साधताना भुजबळ यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या विधानावर भाष्य केले होते. “बाळासाहेबच म्हणायचे भुजबळ गेले नसते तर शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले असते”, असं भुजबळांनी सांगितलं. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेनेमध्ये अनेक सामान्य लोकांना मुख्यमंत्री आणि मंत्री बनवण्यात आलं आहे. असे अनेक लोकं आहेत दुर्देवी, ज्यांनी शिवसेना सोडली आणि नंतर ते इतर पक्षात गेले. पण त्यांच्या नशीबी काय आलं शेवटी? ठिक आहे. कोणी मंत्री झाला असेल, कोणी केंद्रात गेला असेल, कोणी काय झाला असेल, पण शिवसेनेच्या वर्तुळात राहून काम करणं ही फार महत्त्वाची गोष्ट असते. छगन भुजबळ शिवसेनेत असते तर नक्कीच आज आहेत त्यापेक्षा सर्वोच्च स्थानी गेले असते, असं राऊत म्हणाले.

Team Global News Marathi: