राज्यात महाराष्ट्रद्रोह्यांचा काळ सुरू आहे; जयंत पाटील यांचा शिंदे सरकारवर आरोप

भारतीय जनता पक्षाकडूनमहापुरुषणावर करण्यात येणाऱ्या बेताल वक्तव्याप्रकरणी विरोधकांनी आता मोर्चे काहून विरोध केला आहे अशातच आता माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे, राज्यात सध्या  महाराष्ट्रद्रोह्यांचा  काळ सुरू असून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करण्याचे काम हाती घेतले आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचेप्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांच्या वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भाजपकडून महापुरुषांच्या सातत्याने होणाऱ्या बदनामीवर पाटील यांनी भाष्य केले. तसेच भाजप नेत्यांवर सडकून टीका केली. आपले महापुरुष हे आपले भूषण आहे. आपला गौरव आहेत. मात्र त्यांचा अपमान केला जात आहे. त्यांना कमी लेखण्याचा राज्यपालांसह भाजपचे नेते सातत्याने प्रयत्न आहेत.
 महापुरुषांची बदनामी केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणारे पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना पाठवले. पत्र लिहायला त्यांना इतका वेळ का लागला? असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला. आता महाराष्ट्रातून जाण्याची वेळ आली हे समजल्यावर तुम्ही पत्र लिहिता, असेही पाटील म्हणाले. तुम्ही महाराष्ट्राच्या विरोधात जे काम केले आहे, महाराष्ट्राला डिवचण्याचे काम केले आहे, त्यामुळे आता महाराष्ट्र राज्यपालांना स्वीकारत नाही असे समोर आले आहे, असे म्हणत पाटील यांनी राज्यपालांना खडेबोल सुनावले.
Team Global News Marathi: