सीमा समन्वयक मंत्री बेळगावला का गेले नाहीत? आमदार रोहित पवारांचा सवाल

 

काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटकमधील सीमाप्रश्न चिघळला आहे. त्यातच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बेळगावमध्ये येणाऱ्या महाराष्ट्राच्या नेत्यांना इशारा दिला होता. बोम्मईंनी दिलेली धमकी धुडकावून लावत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे आज, बेळगावमध्ये दाखल झाले. यानंतर ते कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना सत्ताधाऱ्यांवर अनेक प्रश्न उपस्थित केले.

यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले, मी बेळगावला जाऊ शकतो, तर मंत्री का जात नाहीत? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. दोनवेळा सांगूनही मंत्री बेळगावला का गेले नाहीत? अशी विचारणा केली. बेळगावात गेल्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीचीच्या नेत्यांशी, नागरिकांशी चर्चा केली तेव्हा लक्षात आलं की राजकीय वातावरण पेटवण्याचा प्रयत्न सुरु होता, पण शरद पवारांनी अल्टीमेटम दिल्यानंतर वातावरण बदलून गेले. कार्यकर्त्यांना डांबण्याचा प्रयत्न होत होता, पण पवारांनी अल्टीमेटम दिल्यानंतर परिस्थिती निवळली.

बेळगावला मी व्यक्तिगत आणि एक नागरिक म्हणून गेलो. मी आजच नाही तर अनेक वेळा त्याठिकाणी गेलो असल्याचे सांगत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार त्याठिकाणचा आढावा घेत असल्याचे त्यांनी सांगितले. तर ज्या ठिकाणी ज्याचे होते तेथे गेलो ज्यांना भेटायचे होते त्यांना भेटलो असल्याचेही ते म्हणाले. संवेदनशील गोष्टीची काळजी घेण्याची आपली सर्वांची जबाबबदारी असल्याचेही ते म्हणाले.

Team Global News Marathi: