रजनीकांत चाहत्यांसाठी मुलीचे हे अनोखे अॅप लॉन्च करणार

 

मुंबई | सुपरस्टार रजनीकांत यांना आज दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले जाणार असून त्याचबरोबर त्यांच्या चाहत्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असून रजनीकांत हे त्यांची कन्या सौंदर्या हिचे अनोखे मोबाईल अॅप लॉन्च करणार आहेत. त्यामुळे ही बाब सध्या सर्वत्र चर्चेची बनली आहे.

रजनीकांत म्हणाले की, आज हा त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा प्रसंग असेल. जेव्हा त्यांना फाळके पुरस्कार मिळेल. तेव्हा हा दिवस त्याच्यासाठी अधिक महत्त्वाचा असेल, कारण त्यांची मुलगी सौंदर्या विष्णन व्हॉईस-आधारित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लॉन्च करेल आणि म्हणेल की हे सर्वांसाठी “उपयुक्त अॅप” असेल.

पुढे रजनीकांत म्हणाले की, हा एक महत्त्वाचा प्रसंग म्हणजे रसिकांचे प्रेम आणि पाठिंबा यामुळे मला भारत सरकारकडून दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला जात आहे. तर दुसरा खास प्रसंग म्हणजे हा दिवस तितकाच महत्त्वाचा ठरेल, कारण माझी मुलगी सौंदर्या, हिने तिच्या स्वतंत्र प्रयत्नांनी जनतेसाठी हूटे नावाचे अतिशय उपयुक्त अॅप बनवण्यात पुढाकार घेतला आहे. देशातील हे पहिले व्हॉईस आधारित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आज, लॉन्च होणार आहे.

Team Global News Marathi: