‘आश्रम ३ ‘च्या सेटवर बजरंग दलाचा राडा,पळवत-पळवत क्रू सदस्यांना दिला चोप

 

काही दिवसांपूर्वी आश्रम या वेब सीरीजने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. तसेच या वेब सीरिजला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली होती. मात्र दुसरीकडे मुख्यमभूमीकेत असलेल्या अभिनेता बॉबी देओल यांच्या ‘आश्रम ३ च्या शूटिंगला भोपाळमध्ये सुरवात झाली असून काही दिवसातच या वेब सीरिजच्या सेटवर बजरंग दलाच्या कार्यर्त्यांनी मोठा गदारोळ घातला होता.

यादरम्यान प्रकाश झा यांच्या चेह-यावर शाई फेकत या कार्यकर्त्यांनी सेटवरच्या साहित्याची तोडफोड केली. इतकंच नाही सेटवरच्या काही क्रू सदस्यांचा पाठलाग करून त्यापैकी एक-दोघांना पकडून त्यांना मारहाण करत व्हॅनिटी व्हॅनसह ५ वाहनांची तोडफोड केली. या हल्ल्यात ४ ते ५ कर्मचारी जखमी झाले.

भोपाळच्या जुन्या तुरुंगात (अरेरा हिल्स) आश्रम ३ या वेबसीरिजचं शूटींग सुरू होतं. शूटिंग चालू असताना रविवारी संध्याकाळी बजरंग दलाच्या सुमारे अडीचशे सदस्यांनी सेटवर हल्लाबोल केला. प्रकाश झा मुर्दाबाद, बॉबी देओल मुर्दाबाद अशा घोषणा देत हे कार्यकर्ते सेटवर आले आणि यांनी प्रकाश झा यांना बाहेर बोलवलं आणि मारहाण केली होती.

Team Global News Marathi: