राज साहेब लवकर बरे व्हा! महापौर किशोरी पेडणेकरांच्या सदिच्छा

 

मुंबई |  महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या मातोश्री यांना कोरूणाची लागण झाल्याचे समोर आले होत. सध्या राज ठाकरे यांचयव्हर लीलावती रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार सुरु होते.दरम्यान राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी फेबूक पोस्ट लिहून सदिच्छा दिल्या आहेत.

राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी काही वेळापूर्वीच आली होती. राज ठाकरे हे लीलावती रुग्णालयातून उपचार घेऊन कृष्णकुंज परतले आहेत. आता ते २ आठवडे होम क्वारंटाईन राहणार आहेत. राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या आई यांचा रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आला होता. कोरोनाची सौम्य लक्षणे असून त्यांचं चेकअप करण्यात आलंय. डॉक्टरांनी त्यांना घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे.

राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून सक्रीय दिसत आहेत. त्यांनी अनेक वेळा पुणे दौरा देखील केला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा देखील घेतला. पण त्यांची प्रकृती बरी नसल्याने इतर त्यांचे सर्व कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले होते.

Team Global News Marathi: