राज कुंद्राला कोर्टाने सुनावली २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी !

 

मुंबई  | उद्योगपती राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं त्यांना चौकशीसाठी सोमवारी रात्री भायखळा येथे बोलावण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर राज कुंद्रा यांच्या अटकेची माहिती समोर येत आहे. पॉर्न फिल्म्स निर्मितीप्रकरणी प्रकरणात राज कुंद्रा यांचं नाव समोर आलं होतं.

फेब्रुवारी महिन्यात मढ परिसरातल्या एका बंगल्यावर टाकलेल्या छाप्यामध्ये अश्लील चित्रपट निर्मिती सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांना कळाली. या प्रकरणाचा तपासाचा एक भाग म्हणून सोमवारी राज कुंद्राला अटक करण्यात आली.

आज राज कुंद्रा आणि दुसरा आरोपी रायन जॉन मायकल थार्प या दोघांना न्यायालयात हजर केलं असता त्या दोघांची २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. यापैकी राज कुंद्राला सोमवारी रात्री तर थार्पला आज सकाळी अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात १२ जणांना अटक करण्यात आली आहे. इतर दहा आरोपी जामिनावर मुक्त आहेत.

Team Global News Marathi: