आधी राहुल गांधी यांची भेट त्यानंतर स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी दिला स्वबळाचा नारा !

 

नवी दिल्ली | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आज दिल्ली पोहचले असून त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. त्यानंतर पटोले यांनी महाराष्ट्रात काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे.

काँग्रेस नेते राहुल यांच्या भेटीनंतर नानांनी थेट स्वबळाची भाषा केल्याने काँग्रेस निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्यासोबत राहणार नसल्याचं स्पष्ट होत आहे. आता नाना पटोले यांच्या या घोषणेनंतर पुन्हा एकदा शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या अडचणी वाढवल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीला अजून वेळ आहे. तीन वर्ष बाकी आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढेल. सरकार आणि संघटना या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. त्याला सर्व पक्षांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे हा वाद संपलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे, यात काही वादच नाही, असं नाना पटोले म्हणाले आहे.

Team Global News Marathi: