नवी दिल्ली | सध्या काँग्रेस पक्ष आणि ट्विटरमध्ये शाब्दिक युद्ध सुरु झाले असून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांचे ट्विट अकाऊंट बंद केल्यानंतर आता ट्विटरने काँग्रेसचे अधिकृत ट्विटर अकाऊंट बंद केले आहे. यावर भाष्य करतानाआमचा लढा सुरूच राहील, असा निर्धार काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आला आहे.
ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आल्याची माहिती काँग्रेसनं फेसबुकच्या माध्यमातून दिली. ‘आमच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आलं, त्यावेळीही आम्ही घाबरलो नाही. मग ट्विटर अकाऊंट बंद केल्यानं का घाबरू? आम्ही काँग्रेस आहोत. जनतेचा संदेश आहोत. आम्ही लढत आहोत. लढत राहू,’ असा निर्धार काँग्रेसनं केला आहे.
तसेच बलात्कार पीडित मुलीला न्याय देण्याासाठी आवाज उठवणं अपराध असेल, तर हा अपराध आम्ही शंभरवेळा करू. जय हिंद, सत्यमेव जयते, अशी प्रतिक्रिया काँग्रेसनं दिली आहे. दिल्लीत एका नऊ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. बलात्कारानंतर मुलीची हत्या करण्यात आली. या मुलीच्या कुटुंबीयांची राहुल गांधींनी भेट घेतली. या भेटीचा फोटो राहुल यांनी ट्विटरवरून शेअर केला होता. त्यामुळे ट्विटरनं राहुल यांचं अकाऊंट लॉक करण्यात आलं होत.