“आश्‍वासने न पाळल्याने काँग्रेसला वाईट दिवस आलेत”

 

उत्तरप्रदेश विधानसभा निडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरु केली आहे, तसेच काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधीं या सुद्धा उत्तरप्रदेश निवडणुकीत पूर्णपणे सक्रिय झाल्या आहेत. त्यातच आज बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी कॉंग्रेसवर पुन्हा टीका केली आहे .

त्या म्हणाल्या की, कॉंग्रेसने आजवर नेहमीच लोकांना भुलवणाऱ्या घोषणा केल्या परंतु त्या घोषणा किंवा आश्‍वासने त्यांनी कधीच पाळली नाहीत म्हणून या पक्षावर आज वाईट दिवस आले आहेत. आज कॉंग्रेसची जशी अवस्था झाली आहे तशीच गत भाजपचीही होणार आहे कारण त्यांनीही कधी आश्‍वासने पाळली नाहीत असेही त्यांनी म्हटले आहे.

कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी राज्यात कॉंग्रेस सत्तेवर आली तर महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलांनी मोबाईल फोन आणि इलेक्‍ट्रीक स्कुटी देण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्या घोषणेवर प्रतिक्रीया देताना मायावती यांनी म्हटले आहे की त्यांच्या या आश्‍वासनावरही कोणाचा विश्‍वास बसणार नाही. निवडणुका जिंकण्यासाठी भाजप आणि समाजवादी पक्षाने जशी आकर्षक घोषणा आणि आश्‍वासने देऊन लोकांची फसवणूक केली तसाच प्रकार सध्या कॉंग्रेस कडून सुरू आहे.

Team Global News Marathi: