स्मार्टसिटीतील घोटाळ्याची तक्रार ईडीकडे करा, शिवसनिनिकांची सोमय्यांकडे मागणी

 

राज्यत सरकार स्थापन झाल्यापासून अनेक मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणाऱ्या भाजपा नेते किरीट सोमय्या विरोधात आता शिवसेना आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. त्यातच पिंपरी-चिंचवड स्मार्टसिटीतील घोटाळ्याची तक्रार ईडीकडे करण्याचे आव्हान दिल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी थयथयाट केला होता.

आता सोमय्यांचा समाचार राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेने त्यांच्याविरोधात शुक्रवारी महापालिकेत उपरोधिक आंदोलन करून घेतला. प्रतिकात्मक किरीट सोमय्या यांच्याकडे स्मार्ट सिटीतील घोटाळ्याची फाईल उपरोधिकपणे सुपूर्द करत ईडीकडे तक्रार करावी. चौकशी लावण्याची हिंमत दाखविण्याचे आव्हान थेट दिले आहे.

महापालिकेत स्मार्ट सिटीच्या नावाखाली सत्ताधारी भाजपाने करदात्यांच्या तिजोरीवर दरोडा टाकला आहे. भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांच्या नातेवाईकांचीच कंपनी असलेल्या क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून ही लूट झाल्याचे कागदोपत्री पुरावे सांगतात.

 

राज्यभर ईडी, सीबीआयच्या माध्यमातून भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर काढणाऱ्या भाजपा नेते किरीट सोमय्यांना या प्रकरणांबद्दल पत्र दिले असता त्यांची अक्षरशः बोबडी वळली अन् तोंड बंद झाले आहे. आता शिवेसना आपल्या पध्दतीने या भोंदू किरीट सोमय्या यांच्या दुटप्पी भूमिकेचा बुरखा फाडणार आहे. महापालिका आयुक्तांनी तत्काळ कारवाई करावी अन्यथा शिवेसेना आगामी काळात याहीपेक्षा तडाखेबंद आंदोलन करणार, असल्याचा इशारा उबाळे यांनी दिला आहे.

Team Global News Marathi: