वीज कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; २० हजारांचे सानुग्रह अनुदान देण्याची मुख्यमंत्री ठाकरे यांची घोषणा

 

मुंबई | आगामी महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाने मुंबई मनपा कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड केली आहे. २०२१ ते २०२४ या तीन वर्षांसाठी २० हजार रुपये सानुग्रह अनुदान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जाहीर केले. पालिकेतील ९५ हजार तर बेस्ट उपक्रमाच्या ३२ हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे. या निर्णयामुळे पालिकेच्या तिजोरीवर अडीचशे कोटी रुपयांहून अधिक आर्थिक बोजा पडणार आहे.

दरवर्षी पालिका प्रशासन आणि कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्याबैठकीनंतर सानुग्रह अनुदानाची रक्कम जाहीर होत असते. तर बेस्ट उपक्रम आर्थिक संकटात असल्याने काहीवेळा कामगार संघटनांच्या आंदोलनानंतर सानुग्रह अनुदान जाहीर झालेे आहे. मागच्या दोन दिवसांपासून यावर निर्णय घेण्यसाठी बैठक सुरु होत्या तर शुक्रवारी थेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावरून पालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे.

गेल्यावर्षी पालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार ५०० रुपये तर बेस्ट कर्मचाऱ्यांना १० हजार १०० रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. मागील दीड वर्ष कोरोना काळात पालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता काम केले आहे. यामध्ये शेकडो कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या रकमेत वाढ करण्यात आली आहे. सानुग्रह अनुदानाची ही रक्कम पुढील तीन वर्षे कायम राहणार आहे.

Team Global News Marathi: