उत्तरप्रदेशचे पुढचे मुख्यमंत्री कोण ? अमित शहा म्हणतायत की,

 

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता राजकीय वातावरण चँगलेच तापू लागले असून सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबंदी सुरु केली आहे तसेच काँग्रेस पक्षाचे नेतृत्व काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी करणार आहे. मात्र यूपीमध्ये २०२२ मध्ये भाजपचा चेहरा कोण असणार? निवडणुकीनंतर आदित्यनाथ हेच मुख्यमंत्री होणार का? या चर्चां होत अस्त्नाना आता या चर्चांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पूर्णविराम दिला आहे. लखनौ येथे आपल्या रॅलीमध्ये शहा यांनी स्पष्ट केले की २०२४ मध्ये नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवायचे असेल तर योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री बनवा.

अमित शहा यांनी भाजप सत्तेत आल्यानंतर केंद्रात आणि राज्यात केलेल्या कामांचा पाढा वाचला. तसेच २०२२ साठीचा यूपीचा रोड मॅप तयार असल्याचे त्यांनी सांगितले आणि त्यासोबत २०२४ मध्ये केंद्रातील रोड मॅपची माहिती दिली. मोदींना केंद्रात कायम ठेवायचे असेल तर योगी आदित्यनाथ यूपीमधून जिंकणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

यूपीच्या जनतेला दिलेली वचने ९० टक्के पूर्ण केली आहेत आणि निवडणुकीच्या आधी शिल्लक राहिलेली वचनेही पूर्ण केली जातील असेही ते म्हणाले. भाजप जे वचन देते ते पूर्ण करते, असेही ते म्हणाले. यूपीत सर्वात जास्त तरुण आहेत. ५३ टक्के तरुण यूपीत राहतात. त्यांना पक्षासोबत जोडलं पाहिजे. गरीब, महिला, दलित आणि मागासवर्गीयांनाही जोडलं पाहिजे.

Team Global News Marathi: