नियमांचे उल्लंघन करण्यावर पोलीस करणार कडक कारवाई

मुंबई : कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून शासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करण्यासाठी तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर चाकण पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईत येथील पोलिसांनी हॉटेल चालकांसह एकूण ४ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.

आतापर्यंत सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या ८९ जणांवर, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या एकावर, तसेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या एकूण २८ जणांवर, त्याचप्रमाणे आस्थापनावर घातलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनावर एकूण ८ केसेस अशा एकूण ७३८ लोकांवर धडक कारवाई करण्यात आल्याची माहिती चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांनी दिली.

तसेच कोरोना पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश असताना रात्री ९ पर्यंत चाकण पोलिसांना पेट्रोलिंग दरम्यान चाकण मार्केट परिसरात समाधान हॉटेल व बिअरबार ही आस्थापना चालू असलेली मिळून आली. हॉटेलमध्ये जमावबंदी आदेशाचा भंग करणाऱ्या लोकांवर प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची कारवाई असा ३३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

Team Global News Marathi: