मुंबईत पोलिसांनी पाच बोगस डॉक्टरांच्या मुसक्या आवळल्या

 

मुंबई | करोनामुळे अनेकजण डाॅक्टरकडे जायला भितात पण अंगावर काढायला नको म्हणून हिंमत करुन डाॅक्टरकडे जातात आणि उपतार घेतात. पण या काळातही कामे करणाऱ्यांची कमी नाहीये. कोणतेही सर्टिफिकेट, डाॅक्टरची पदवी, कोणताही वैद्यकीय उपचाराचा अनुभव नसतानाही बोगस पदवींच्या आधारे मुंबई सारख्या सुशिक्षित शहरात बोगस डाॅक्टरगिरी केली जातेयेआणि लोक सुद्धा त्यांना बाली पडतायत. या बोगस डाॅक्टरगिरीचा पर्दाफाश करत मुंबई पोलिसांनी ५ बोगस डॉक्टरांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

मुंबईतील शिवाजीनगर आणि गोवंडी भागातून या ५ बोगस डाॅक्टरांना अटक करण्यात आली आहे. शिवाजीनगर तसेच गोवंडी भागात मध्यमवर्गीय आणि हातावर पोट असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यातच करोनामुळे कंबरडे मोडल्याने आर्थिक चणचण असलेल्या लोकांच्या मजबूरीचा फायदा घेवून हे ५ बोगस डॉक्टर कोरोना बाधित रुग्णांवर देखील उपाचर करत होते असं संशय पोलिसांनी वर्तवला आहे.

कारण कोरोना रुग्णांवर उपचार करण्याकरता वापरली जाणारे औषधे अँन्टीबायोटिक टॅबलेट्स, सर्जिकल टे, पॅरसिटॉमॉल डेक्झा टॅबलेट्स, टोरमॉक्झान ५०० एम.जी, सिरिन्स सलायन बॉटल्स्‌, अन्टॉसिड्स टॅबलेट, बायेमेडीकल वेस्ट मटेरियल, रॅन्टीडाईनहायड़ोक्लोराइड इंजेक्शन ही औषधे पोलिसांनी या बोगस डाॅक्टरांकडून जप्त केली आहेत.

वरिल बोगस डॉक्टरांविरुध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला असून बोगस डॉक्टरांना पुढील कारवाईसाठी शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई मुंबई क्राईम ब्रांच युनिट ६ चे पोलीस निरीक्षक हणमंत ननावरे आणि नितिन सावंत यांनी महत्वाची कामगिरी केली असून त्यांना या मोठ्या कारवाईत बृहन्मुंबई महानगरपालिका येथील सहाय्यक वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रिया कोळी यांच्यासह 5 डाॅक्टरांचे वैद्यकीय पथकाने मदत केली

Team Global News Marathi: