बाबासाहेबांचे आचार, विचार घेऊन मला देशात काम करायचंय – नारायण राणे

 

महाराष्ट्रातील भाजपचे चार केंद्रीय नेते सोमवारपासून महाराष्ट्रभर जन आशीर्वाद यात्रा काढणार आहेत. यामध्ये अनेक भागात नव्यानं झालेले केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या यात्रेचं नियोजन केले. लोकांशी संवाद साधण्यासोबतच केंद्रातील योजनांची माहिती देखील ते जनतेला देणार आहेत. त्यातच आज पासून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जन आशीर्वाद दौरा मुंबईतून सुरु झाला आहे.

नारायण राणे यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन केलं. बाबासाहेबांनी देशाला जे काय दिलंय त्याचं शब्दात वर्णन करता येत नाही. अभूतपूर्व आहे त्यांनी देशाला घटना दिली. घटनेप्रमाणं देश चालतो, आम्ही रोज घटनेप्रमाणं काम करतो. गरीबांनी शिक्षण घ्यावं, शिस्त लावली असे उदगार त्यांनी यावेळी काढले होते.

बाबासाहेब तुमचे आशीर्वाद माझ्यावर राहू देत, अशा शब्दात नारायण राणे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयीच्या भावना व्यक्त केल्या. नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा आज सकाळी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापासून सुरु झाली. नारायण राणे यांनी चैत्यभूमीवर येण्यापूर्वी शिवाजी पार्कवर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकेर यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं.

Team Global News Marathi: