पोलीस अधिकाऱ्यातील कलाकार; बासरी वाजवून उपस्थितांना केलं मंत्रमुग्ध

 

मुंबई | मुंबईकरांना तणावमुक्त व आरोग्यदायी वातावरणात आठवड्यातील किमान काही तास तरी घालवता यावेत या हेतूने मुंबई पोलिसांनी ‘संडे स्ट्रीट’ ही संकल्पना 27 मार्च 2022 पासून सुरू केली आहे. त्याच अंतर्गत आज मुंबईतील रफी अहमद किडवई मार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब कुळे यांनी बासरीचे सुरेल असे वादन केले.

आज दादासाहेब कुळे यांच्या आत लपलेले कलाकार बाहेर आले आणि त्यांनी बासरीच्या तालावर बॉर्डरचे गाणे वाजवून सर्वांना मंत्रमुग्ध केले. काय आहे संडे स्ट्रीड प्रोग्राम – कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर मुंबई पूर्वपदावर आली आहे. निर्बंधांमुळे गेले दोन वर्ष धावती मुंबईला ब्रेक लागला होता.

अनेकजण ताण तणावात जीवन जगत आहेत. मुंबईकरांना तणावमुक्त करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या संकल्पनेतून संडे स्ट्रीट हा उपक्रम सुरू झाला आहे. मुंबईतील 13 रस्त्यांवर सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत हा उपक्रम राबवला जात आहे. बासरीद्वारे सुरेल वादन – मुंबई पोलिसांकडून दर रविवारी संडे स्ट्रीट कार्यक्रम आयोजित केला जातो.

या कार्यक्रमाच्या अंतर्गत आज मुंबईतील एका पोलीस अधिकाऱ्याच्या आतील कलाकार बाहेर आला. यानंतर त्यांनी जे केले त्यामुळे सर्वच जण मंत्रमुग्ध झाले. दादासाहेब कुळे असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. ते रफी अहमद किडवई मार्ग पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर सेवेत आहेत. संडे स्ट्रीट या कार्यक्रमाच्या माध्यमातून दादासाहेब कुळे यांच्या आत लपलेला कलाकार बाहेर आला आणि त्याने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले.

Team Global News Marathi: