उद्धव ठाकरेंमध्ये दम असेल, तर माझ्याविरुद्ध कोणत्याही जिल्ह्यातून निवडणूक लढून दाखवावी

 

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना आज लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून बाहेर पडताच नवनीत राणा यांनी यांनी सिंहगर्जना केली. यावेळी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकर यांना ओपन चॅलेंज दिलं आहे. यावेळी मोठ्या संख्यने त्यांना भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्ये भेटलेला आले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील कोणत्याही मतदार संघात निवडणूक लढवावी, मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढीन, असं राणा म्हणाल्या आहेत. एवढंच नाहीतर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात शिवसेनेच्या विरोधात प्रचार करणार असल्याचं नवनीत राणा यांनी सांगितलं आहे. त्यामुळे येणार्य कळत शिवसेना आणि राणा दाम्पत्यांमध्ये वाद अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये दम असेल, तर माझ्याविरुद्ध कोणत्याही जिल्ह्यातून लढून दाखवा. मी तुमच्याविरोधात निवडणूक लढणारच आहे. नारीशक्ती काय असते हे तुम्हाला दाखवून देऊ. तुम्हाला पराभूत केल्याशिवाय राहणार नाही,” असं नवनीत राणा म्हणाल्या आता राणा यांच्या या टीकेला शिवसैनिक कशा प्रकारे पकरतात हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: