कृपा करून ‘५ जी’ आणा मात्र त्यावरील संशोधन, अभ्यास सगळे काही सार्वजनिक करा -जुही चावला

मुंबई | मोबाइलच्या ५ जी तंत्रज्ञानाला विरोध करून बंड पुकारणाऱ्या अभिनेत्री जुही चावला यांची याचिका अलीकडेच दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावत न्याययंत्रणेचा महत्त्वाचा वेळ वाया गेल्याचे ताशेरे ओढत जुहीला २० लाख रुपयांचा दंडही ठोठावला. आता यावर जुही चावला हिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत तिची भूमिका मांडली आहे. आम्ही ५ जीच्या विरोधात नाही, फक्त तुम्ही ते सुरक्षित आहे याची हमी द्या, असे जुहीने म्हटले आहे.

जुहीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओत म्हंटल आहे की, ‘नमस्ते, गेल्या काही दिवसांत इतका गोंधळ, गदारोळ झाला की, मी स्वत:लाही ऐकू शकली नाही. या गोंधळात एक अतिशय महत्त्वपूर्ण संदेश विरला. तो म्हणजे, आम्ही ५ जी विरोधात नाही. उलट आम्ही तर याचे स्वागत करतो. कृपा करून ५ जी आणा. आमची मागणी फक्त एवढीच आहे की, ५ जी सुरक्षित आहे, हे अधिका-यांनी स्पष्ट करावे.

https://www.instagram.com/iamjuhichawla/channel/?utm_source=ig_embed&ig_rid=7fc059e2-6814-442f-ac99-07bcf1fe8332

 

पुढे ती आपल्या व्हिडिओत म्हणते की, कृपा करून तुम्ही सर्टिफाइड करा, यावरचे संशोधन, अभ्यास सगळे काही सार्वजनिक करा, जेणेकरून या तंत्रज्ञानाबद्दलची आमच्या मनातील भीती दूर पळून जाईल आणि आम्ही आरामात झोपू शकू. ही प्रणाली गर्भवती महिला आणि त्यांच्या गर्भात वाढणाºया बाळांसाठी सुरक्षित असावी, इतकेच आमचे म्हणणे आहे आणि आम्हाला हेच जाणून घ्यायचे आहे असे तिने व्हिडिओत म्हंटले आहे.

Team Global News Marathi: