मुंबईत कोणी किंमत दिली नाही, आम्ही बांगड्या भरल्या नाहीत छत्रपती संभाजीराजे संतापले

कोल्हापूर | राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्धा तापत असताना आता खासदार छत्रपती संभाजी राजेंनी कोल्हापुरात मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपली भूमिका मांडलेली आहे. येत्या १६ जूनला कोल्हापुरातून पहिला मराठा मोर्चा काढण्यात येणार आहे अशी घोषणा राजेंनी कोल्हापुरात आज केली आहे.

तसेच होणारे आंदोलन मूक असेल. या आंदोलनाची टॅगलाईन “आम्ही बोललोय आता लोकप्रतिनिधींनी बोलायला लागतंय” अशी असेल. त्यादिवशी लोकप्रतिनिधींना बोलावं लागेल. मी काय जबाबदारी घेणार हे त्यांना सांगावं लागेल, असं संभाजीराजे म्हणाले. कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका जाहीर केली.

आज ३६ जिल्ह्यात आंदोलन करूनही सरकारने दखल घेतली नाही तर काय करायचं, आपण बांगड्या भरल्या आहेत का? दखल घेतली नाही तर एकदाच जोर लावायचा. पुण्यापासून मंत्रालयापर्यंत लॉंग मार्च काढायचा. पण ही वेळ आमच्यावर येऊ देऊ नका, असा इशारा संभाजीराजेंनी राज्य सरकारला दिला त्यामुळे आता राजेंनी मराठा आरक्षणासंदर्भात रोखठोक भूमिका कोल्हापुरात मांडलेली आहे.

पुढे बोलताना राजे म्हणाले की, आता टेक्निकली डोकं लावून पुढची भूमिका घेतली पाहिजे. आता पहिली जबाबदारी माझी, त्यानंतर खासदार आणि त्यानंतर आमदारांची आहे. तुम्ही समाजासाठी काय करताय हे आमदार खासदारांना कोणी विचारलं का? ही दिशा फक्त कोल्हापूरसाठी नाही तर राज्यासाठी असेल. ही भूमिका आक्रमक असेल पण टेक्निकल असेल, असं संभाजीराजे म्हणाले.

Team Global News Marathi: