जनतेने साधव व्हावं! किती भाजी आणि चिकन घेता यावरही ईडीची नजर’

 

राज्यात ईडीकडून महाविकास आघाडीच्या नेत्यावर होत असलेल्या कारवाईवर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी रोखठोख भूमिका मांडत थेट भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. तुम्ही भाजीची जुडी जरी विकत घ्यायला गेलात, तरी तुमच्यावर ईडीचं लक्ष आहे. काल किती चिकन घेतलं आणि आज किती चिकन घेतलं त्यावरही भाजपच्या पदाधिकाऱ्यांचं लक्ष आहे आणि ताबडतोब ते ईडीला कळवतील. महाराष्ट्रताल्या जनतेने सावध राहिलं पाहिजे असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी महाराष्ट्रात सुरु असलेल्या भोंगा वादावरही प्रतिक्रिया दिली आहे. देशात अनेक राज्यात अजूनही भोंगे उतरलेले नाहीत, तिथल्या हायकोर्टाचे आदेश असूनही अनेक भाजप शासित प्रदेशात आजही भोंगे आहेत. गोव्यातही भाजपचे दहा वर्षांपासून राज्य आहे. उत्तर प्रदेशमध्येही भोंगे आहेत तसेच आहेत. महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट सुचना दिल्या आहेत. त्याचं पालन होणं गरजेचं आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रातले सर्वपक्षीय आमदार आज दिल्लीत आहेत. महाराष्ट्रातील जे आमदार दिल्लीत उपस्थित आहेत त्या सर्वांना आमंत्रण आहे. सर्वपक्षीय आमदारांना चहापानांचा निमंत्रण असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे भोजन व्यवस्था आहे. आम्ही यजमान आहोत. महाराष्ट्राच्या राजकारणात याआधी असं खेळीमेळीचं वातावरण होतं. ते तसंच राहावं असं आम्हाला वाटतं असं संजय राऊत यांनी म्हटलं.

Team Global News Marathi: