लोक पावसामुळे मेले तरी मुख्यमंत्री घर सोडायला तयार नाहीत

 

 

मुंबई |  शनिवारी रात्रीपासून पडणाऱ्या धो-धो पावसाने अक्षरशः मुंबईला पावसाने झोडपले आहे. आज मुंबईतील अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचले आहे तसेच अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी घुसल्यामुळे मोठया प्रमाणात घरांचे नुकसान झाले आहे. तर चेंबूर आणि भांडुप येथे दरड कोसळून दुर्घटनांमध्ये ३० जणांचे बळी घेतले आहे.

 

याच मुद्द्यावरून आता भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे. मुंबईत घडलेल्या घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन भेट न देण्यावरुन भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी निशाणा साधला आहे. मुंबईत २५ लोक पावसामुळे मेले तरी मुख्यमंत्री महोदय घर सोडायला तयार नाहीत, हात टेकले यांच्यासमोर..,’ अशी टीका त्यांनी ट्वीट करत केली आहे.

 

त्यातच आता पावसाने मुंबईकरांना अक्षरशः झोडपले आहे. मुंबईच्या सर्वच भागांत अतिमुसळधार पाऊस कोसळला, तर काही भागांत अतिवृष्टी झाली. मध्यरात्री दीड ते दोन तासांत अनेक भागांत २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस कोसळल्याची नोंद करण्यात आली. दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर येथे काही ठिकाणी सोमवारी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

 

Team Global News Marathi: