चंद्रकांत पाटील – राज ठाकरे भेटीवर रोहित पवारांचा पाटलांना टोला

 

नगर | शुक्रवारी नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावर राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील या दोन्ही नेत्यांची भेट झाली होती. या भेटीदरम्यान विविध मुद्द्यावर चर्चा झाल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले तसेच युती संदर्भातील चर्चेविषयी वृत्त फेटाळले होते . यावर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे.

अहमदनगरच्या पाथर्डी येथे कोरोना काळात काम करणाऱ्या डॉक्टर आणि कोरोना सेंटरमध्ये काम करणाऱ्यांचा स्वयंसेवकांचा आमदार रोहित पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. हिंद सेवा मंडळाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना ठाकरे-पाटील भेटीवर भाष्य करताना चंद्रकांत पाटलांचा खरपूस समाचार रोहत पवारांनी घेतला होता.

चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे एकाच गावात असल्यामुळे भेटले असतील. राजकारणा पलीकडे संबंध असतात. मराठा आणि ओबीसी आरक्षण या सारख्या संवेदनशील विषयावर राजकारण करू नका. असं केलंत तर आयुष्यात कधीच सत्ता मिळणार नाही आणि जे विषय केंद्र सरकारकडे आहेत त्यावर राजकारण करू नका, असं राज ठाकरे यांनी चंद्रकांत दादांना म्हटलं असेल असा टोला रोहित पवारांनी पाटलांना लगावला होता.

Team Global News Marathi: