“पवार-मोदी भेटीत नुसती हवापाण्याची चर्चा होणार नाही, राजकीय चर्चा तर होणारच”

 

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली आहे. दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयात या दोन नेत्यांची भेट झाली. जवळपास १ तासांहून अधिक वेळ त्यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांनी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली आहे.

 

आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर मोदी आणि शरद पवार यांच्या बैठका कमी झाल्या होत्या. शरद पवार यांच्या शस्त्रक्रियानंतर या दोन नेत्यांची पहिलीच भेट झाली आहे. या भेटीवर आता भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांची भेट झाली की नाही मला माहीत नाही. कल्पना नाही. त्यामुळे माहीत नसलेल्या गोष्टीवर भाष्य करणं योग्य होणार नाही. शरद पवार हे मोठे नेते आहेत. त्यामुळे ते मोदींना भेटणं स्वाभाविक आहे, असं सांगतानाच महाराष्ट्रातील तीन पक्षाचं तीन दिशेला तोंड आहे. त्यामुळे पवार व्यथितही असतील.

पुढे बोलताना दरेकर म्हणाले की, महाराष्ट्राचा विकास पुढे जात नाही या कल्पनेमुळे ते व्यथित असतील. अशावेळी मोदींसोबत चर्चा करावी असं त्यांना वाटलं असेल. राजकीय पक्ष कोणताही असला तरी आपल्या राज्याचा विकास करणं हाच प्रत्येक पक्षाचा अंतिम ध्यास असतो. पण पवार मोदींना भेटायला गेले म्हणजे ते नुसत्या हवापाण्याच्या गोष्टी करणार नाहीत. राजकीय चर्चा तर होणारच, असं दरेकर म्हणाले.

Team Global News Marathi: