राज ठाकरेंनी पक्ष म्हणून सर्वसमावेशक, व्यापक भूमिका घ्यावी – प्रवीण दरेकर

 

मुंबई | सध्या महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि भारतीय जनता पक्षामध्ये युतीच्या चर्चांना आता जोर धरू लागला आहे. मनसेसोबत युती करण्याबाबत भाजपा नेत्यांनी गेल्या दोन दिवसांपासून प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

यावर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी भाष्य केले आहे. मनसे आणि भाजपा एकत्र येण्याची चर्चा ही चर्चाच असावी, असे म्हणत राज ठाकरे यांनी पक्ष म्हणून व्यापक आणि सर्वसमावेशक भूमिका घेतली पाहिजे, असा सल्ला दरेकर यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या विधानावर SUDDHA भाष्य केले होते

राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील हे दोन्ही वरिष्ठ नेते नाशिकमध्ये आहेत. ते एकमेकांना भेटू शकतात. राज ठाकरे यांनी पक्ष म्हणून व्यापक आणि सर्वसमावेशक भूमिका घ्यावी. आमच्या वरिष्ठ नेत्यांनीही हे मत अनेकदा व्यक्त केले आहे. मात्र, या संदर्भातील नेमकी माहिती चंद्रकांत पाटीलच देऊ शकतील”, असे प्रवीण दरेकर म्हणाले.

Team Global News Marathi: