परमबीर सिंह खंडणी प्रकरणातील दोन निलंबित पोलीस पुन्हा सेवेत

 

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह खंडणी प्रकरणात निलंबित दोन पोलीस अधिकारी पुन्हा सेवेत रूजू करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे व आशा कोरके अशी सेवेत पुन्हा समाविष्ट करण्यात आलेल्यांची नावे आहे. अटकेनंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती

नुकत्याच झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांविरोधातील अंतर्गत चौकशीच्या निष्कर्षांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर दहा महिन्यांहून अधिक काळ निलंबित असलेल्या या अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजू करण्यात आले. व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांनी परमबीर सिंह, गोपाळे आणि कोरके यांच्यासह अन्य पाच अधिकारी, संजय पुनमिया आणि सुनील जैन यांच्याविरुद्ध फसवणूक आणि खंडणी मागितल्याची तक्रार दाखल केली होती.

परमबीर सिंह, डीसीपी अकबर पठाण यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला होता. बिल्डर श्याम सुंदर अगरवाल यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. केस मागे घेण्यासाठी आपल्याकडे खंडणी मागितल्याचा दावा अगरवाल यांनी केला आहे.

या आरोपानंतर परमबीर सिंह यांच्यासह सहा जणांवर खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. मुंबईतील मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. संजय पुनमिया आणि सुनील जैन यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून, हे दोघे परमबीर यांच्यासाठी खंडणी उकळायचे, असा आरोप आहे.

 

Team Global News Marathi: