“अयोध्येचं जाऊ द्या, संजय राऊतांनी मुंबई-महाराष्ट्रात एकटं फिरुन दाखवावं”

 

मुंबईसह राज्यभरातील महानगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली असून, भाजपविरोधात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा प्रयत्न होताना पाहायला मिळत आहे. यातच अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपही तीव्र होताना पाहायला मिळत आहेत.

भारतीय जनता पक्ष नेते आणि आमदार नितेश राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. अयोध्या सोडा. पण संजय राऊत मुंबई-महाराष्ट्रात एकटे तरी फिरले तरी काय अवस्था होईल हे कळेल, अशी खोचक टीका केली आहे. संजय राऊत यांच्यासारख्या लोकांना महत्व द्यायचे नाही, असे आम्ही ठरवले आहे.

पुढे बोलताना राणे म्हणाले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल बोलण्यापेक्षा संजय राऊत यांनी एकटे अयोध्या सोडा, मुंबई-महाराष्ट्र तरी फिरले तरी काय अवस्था होईल हे कळेल. संपूर्ण दिवस शरद पवार यांची आणि अन्य लोकांची हाजी-हाजी करुन परत एकदा खासदार झाले आहेत. राऊत हे नक्की शिवसेनेच्या की राष्ट्रवादीच्या कोट्यातून खासदार झाले आहेत, अशी विचारणाही नितेश राणे यांनी केली.

केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले. मात्र राज्यातील सत्ताधाऱ्यांना एक टक्का लाज उरली आहे वाटतं, त्यामुळे त्यांनी काहीतरी दिखावा केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही राज्य सरकारकडे इंधनावरील कर कमी करण्याची मागणी करत होतो. मात्र नंतर आम्हाला समजले आर्थिक बजेटचा उद्धव ठाकरे यांच्याशी काहीही संबंध नाही. त्यांना फक्त बॅगा आणणे आणि बॅगा पोहोचवणे एवढेच येते

Team Global News Marathi: