पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान दुसऱ्यांदा चढले बोहल्यावर

 

पंजाब | पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी गुरुवारी डॉक्टर गुरप्रीत कौर यांच्याशी लग्नगाठ बांधली. राज्यसभा खासदार राघव चढ्ढा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही त्यांच्या चंदीगड येथील निवासस्थानी झालेल्या विवाह सोहळ्याला हजेरी लावली होती.या कार्यक्रमाला आम आदमी पार्टीचे अनेक बडे नेते उपस्थित होते. दरम्यान लग्नातील सर्व मोठे विधी केजरीवाल करणार असल्याचेही बोलले जात आहे.

आप नेते चड्ढा यांनी विधींशी संबंधित एक फोटो पोस्ट केला आणि लिहिले, ‘मन साहेब नू लाख लाख वादियां’ कॉमेडियनमधून राजकारणी बनलेल्या मानने 6 वर्षांपूर्वी पहिली पत्नी इंद्रप्रीत कौरपासून घटस्फोट घेतला. सध्या इंद्रप्रीत आपल्या मुलांसह अमेरिकेत राहत आहे. विशेष म्हणजे मान यांच्या शपथविधी सोहळ्याला त्यांची दोन्ही मुले उपस्थित होती. याशिवाय गुरप्रीतही त्या कार्यक्रमाचा भाग झाल्याची बातमी आहे.

मान आणि डॉ कौर गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना ओळखत असल्याचं बोललं जात आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आप नेत्यासोबत प्रचारही केल्याचे वृत्त आहे. डॉ. कौर या तीन बहिणींमध्ये सर्वात लहान आहेत. त्यांच्या एका बहिणीचा विवाह माजी कॅबिनेट मंत्री दिवंगत जसविंदर सिंग संधू यांच्याशी झाला होता. त्याचबरोबर त्यांच्या नात्यातील ताराही राजकारणाशी संबंधित आहेत. सीएम मानच्या सासऱ्याकडे कॅनडाचे नागरिकत्व आहे.

Team Global News Marathi: