राज्यात पावसाचा जोर कायम ; हवामान खात्याकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

 

राज्यातल्या जवळपास सर्वच भागात पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे. येत्या चार ते पाच दिवसात राज्यामध्ये मान्सून सर्वाधिक सक्रिय राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या कालावधीमध्ये कोकण मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

तर विदर्भ मराठवाड्यातही काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. पाचव्या दिवशी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पाऊस पडणार अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे याबाबतची माहिती हवामान तज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे आज दिनांक सात रोजी पुणे ,सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे.

या भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई आणि चंद्रपूर या भागाला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. औरंगाबाद जालना परभणी नांदेड हिंगोली, वाशिम बुलढाणा अकोला यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर गोंदिया आणि गडचिरोली या भागाला येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्यातील उर्वरित भागात हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे.

Team Global News Marathi: