पंचनामा म्हणून आर्यनच्या कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या, गोसावीच्या बॉडीगार्डचा दावा

 

मुंबई | ड्रग्स पार्टी प्रकरणी एनसीबीने मारलेल्या छाप्यामध्ये अभिनेता शारुख खान याच्या मुलाला अटक करण्यात आली होती. या प्रकरणी राज्यातील वातावरण सुद्धा चांगलेच तापलेले दिसून आले होते तसेच राष्ट्र्वादीने चाहते एनसीबी आणि भारतीय जनता पक्षावर आरोप लगावला होता. आता त्या पाठोपाठ या प्रकरणाला नवे वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आर्यन खानला जेव्हा अटक करुन एनसीबीच्या कार्यालयात आणण्यात आलं होतं. त्यावेळी आर्यनचा हात पकडून त्याला एनसीबीच्या कार्यालयात घेऊन येणाऱ्या व्यक्तीचा आर्यन खानसोबतचा एक सेल्फी व्हायरल झाला होता. या व्यक्तीचे नाव किरण गोसावी असून सध्या हा व्यक्ती फरार असून एक खासगी गुप्तहेर असल्याची माहिती समोर येत आहे.

मग तो एनसीबी’चा अधिकारी तो एनसीबीचा अधिकारी नव्हता मग आर्यनचा हात पकडून त्यानं एनसीबीच्या कार्यालयात त्याला कोणत्या अधिकाराखाली आणलं? असा सवाल उपस्थित केला गेला. त्यातच फरार झालेल्या किरण गोसावी याचा बॉडीगार्ड प्रभाकर सैल यानं प्रसिद्ध हिंदी वृत्त वाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी क्रूझवर केलेल्या छापेमारीवेळी आपल्याकडून जबरदस्तीनं कोऱ्या कागदांवर पंचनामा म्हणून साक्षीदाराच्या रुपात सह्या घेण्यात आल्या, असा दावा प्रभाकर सैल यानं केला आहे.

Team Global News Marathi: