रयत शिक्षण संस्थेचे खासगीकरण करणे म्हणजे रयतेला फुली मारण्यासारखे

 

सातारा | भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टिका केल्यानंतर त्यांनी रयत शिक्षण संस्थेचे खासगीकरण करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप थेट राष्ट्रवादीवर केला आहे. तसेच यावेळी त्यांनी रयत शिक्षण संस्थांवरून अनेक प्रश्न उपस्थित केला आहे.

संस्थेचे खासगीकरण करणे म्हणजे रयतेला फुली मारण्यासारखे आणि एका कुटुंबाला महत्व देण्यासारखे आहे,रयत शिक्षण संस्थेची घटना त्या अनुषंगाने कुठल्याही प्रकारचे राजकारण या संस्थेत येऊ नये म्हणून या संस्थेचा अध्यक्ष हा राज्याचा मुख्यमंत्री असावा, असं म्हणत माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाना साधला आहे.

उदयनराजे भोसले म्हणाले, रयतमध्ये सत्तेचे केंद्रीकरण सुरू असून वडाच्या झाडाचे केंद्रीकरण किंवा खासगीकरण झाले तर हा वटवृक्ष वठणार आणि त्याला वाळवी लागेल. असं झालं तर सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागेल.

रयत शिक्षण संस्थेची घटना कर्मवीर अण्णांनी केली होती. त्याच्या आधारावर संस्थेची स्थापना झाली होती. पण असं काहीतरी घडलंय की अण्णांच्या विचारांशी फारकत घेण्यात आली आहे. सध्या रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार आहेत. मात्र या संस्थेचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच हवेत, असा मुद्दा उपस्थित करून उदयनराजे यांनी शरद पवारांच्या अध्यक्षपदाबद्दल आक्षेप घेतल्याचं दिसून येत आहे.

Team Global News Marathi: