“आपलं मुंबई शहर उद्ध्वस्त होतंय, आपण आपल्या घरातच मरतोय, याला जबाबदार कोण?”

 

मुंबई | मुंबई महानगर पालिका निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे अशातच आता विरोधकांनी थेट सेनेवर निशाणा साधायला सुरवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आज मुंबई ताडदेव येथे घडलेल्या घटनेवरून मुंबई मानपावर निशाणा साधला आहे.

त्यातच आज मुंबईतील ताडदेव भागात अत्यंत धक्कादायक घटना घडली असून येथील एका इमारतीत अग्नी तांडव बघायला मिळाला आहे. ताडदेव भागातील एका २० मजली इमारतीच्या १८ व्या मजल्यावर सकाळी भीषण आग लागली असून ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. तसेच या घटनेत १५ जण जखमी झाले आहेत, तर ६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यावरूनच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे.

“आपलं मुंबई शहर समोर उद्ध्वस्त होत आहे. सरकारी इस्पितळात सुरक्षिततेच्या नियमांचे पालन न केल्यामुळे आम्ही हॉस्पिटलमध्येच मरतोय, खड्डे आणि अनागोंदीने भरलेल्या रस्त्यांवर रस्ते अपघातात आपण मरतोय, याला कोण जबाबदार आहे?” असा सवाल करणारे ट्वीट अमृता फडणवीस यांनी केले आहे.

 

Team Global News Marathi: