रुपाली पाटील यांनी मानले शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांचे आभार वाचा का?

 

पुणे | जिल्ह्यातील परतेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आणि ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजित डिसले यांना अमेरिकेत पीएच. डी. करण्यासाठी जाण्यापासून रोखले जात असल्याचा गंभीर आरोप डिसले गुरुजी यांनी केला होता. या आरोपांवरून राज्यात शिक्षण खात्यावर टीका होताना दिसून आली होती.

त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी ट्विट करत शिक्षण विभागाने त्यांच्याकडे पैशांची मागणी केल्याचा आरोप केला होता. तसेच डिसले गुरुजी यांची रजा मंजूर करण्याची मागणी रुपाली पाटील यांनी केली होती. अखेर डिसले गुरुजी यांची रजा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मंजूर केली आहे.

 

या संदर्भातील माहिती मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून दिली आहे. त्यावर रुपाली पाटील यांनी वर्षा गायकवाड यांचे आभार मानले आहेत. तसेच डिसले गुरुजी यांचे अभिनंदन केले आहे. तसेच, वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन डिसले गुरुजींच्या विदेशावारी शिष्यवृत्तीसाठीच्या रजेचा अर्ज मंजूर करण्याचेही त्यांनी निर्देश दिले आहेत.

सोलापूरच्या परितेवाडी जी.प. शाळेतील शिक्षक रणजित डिसलेजी यांनी उच्च शिक्षणासंदर्भात दिलेल्या अर्जाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.दिलीप स्वामी यांच्याशी चर्चा करून हा अर्ज मंजूर करण्यास सांगितले आहे, असे ट्विट वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

Team Global News Marathi: