एका दिवसात विना मास्क न फिरणाऱ्या ६ हजार मुंबईकरांकडून वसूल केला इतका दंड

 

मुंबई | कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर अद्यापही बेजबाब्दाररपणे वागताना दिसून येत आहे. त्यातच या बेजबाबदार वागणाऱ्या मुंबईकरांना धडा शिकवण्याची मोहीम मुंबई आणि मनपाने हाती घेतली होती. याच पार्श्वभूमीवर विना मास्क न फिरणाऱ्यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी मोहीम उघडली होती.

 

मास्क न घालणाऱ्यांकडून महानगरपालिकेप्रमाणेच मुंबई पोलिसांनी सुद्धा दंड आकारण्यास सुरुवात केली होती. पण ही कारवाई मध्यंतरी मुंबई पोलिसांनी बंद केली होती. आता ही कारवाई गुरुवारपासून पुन्हा युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आल्याचे दिसत आहे. एकाच दिवसात मास्क न घालणाऱ्या ६४७४ लोकांकडून मुंबई पोलिसांनी दंड वसूल केला आहे.

मास्क न घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश मुंबईचे सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी दिले होते. अगदी काही दिवसांवर गणेशोत्सव आला असून रुग्ण संख्या पुन्हा वाढू नये म्हणून मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. मुंबईमध्ये १३ परिमंडळ आहेत. गणेशोत्सवाच्या दरम्यान प्रत्येक परिमंडळामध्ये स्थानिक पोलीस स्टेशन आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त एक विशेष पथक सुद्धा नेमण्यात येणार आहे. म्हणजेच मुंबईमध्ये १३ विशेष पथक पोलिसांकडून नेमण्यात येणार आहेत.

दिंडोशी ते दहिसर पर्यंत असलेल्या परिमंडळ १२ मध्ये सर्वात मोठी कारवाई करण्यात आली. येथे ७१९ लोकांकडून पोलिसांनी दंड आकारला आहे. तर काळाचौकी ते सायनपर्यंत असलेल्या परिमंडळ ४ मध्ये मास्क न घालणाऱ्या ६६६ जणांवर कारवाई करण्यात आली. तर परिमंडळ ६ मध्ये ६४६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

दादर, शिवाजी पार्क, माहीम, विनोबा भावे नगर, कुर्ला या परिसरांचा समावेश होतो. या ठिकाणी मास्क न घालण्याऱ्या ५५५ लोकांवर कारवाई करण्यात आली. परिमंडळ २ मध्ये सुद्धा अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली. या परिमंडळात मास्क न घालण्याऱ्या ५४९ लोकांवर कारवाई करण्यात आली.

Team Global News Marathi: