“शेतकऱ्यांनो बैलपोळा साजरा करा, मनसे तुमच्यासोबत”

 

राज्यात मागच्या काही दिवसांपासून बैलगडा शर्यतीच्या मुद्द्यावरून राजकारण तापलेले दिसून येत आहे. विरोधकांबरोबर सत्ताधारी सुद्धा बैलगाडा शर्यतीच्या मुद्द्यावर ठाम आहेत त्यातच आता या प्रकरणात मनसेने उडी घेत बैलगाडा शर्यतीला आपला पाठिंबा दर्शवला आहे. त्यातच राज्यातील राज्यातील काही भागात सोमवारी बैलपोळा सण साजरा करण्यात येणार आहे. परंतु प्रशासनाकडून विदर्भात निर्बंध आणल्याने मनसे नेते संतप्त झाले आहेत.

निर्बंधानंतरही सोमवारी बैलपोळा सण साजरा करण्याचा इशारा मनसेने दिला आहे. ‘शेतकऱ्यांनी बैलपोळा साजरा करावा, मनसे शेतकऱ्यांसोबत’, मनसैनिक स्वत: गावात जावून बैलपोळा साजरा करणार असल्याची माहिती मनसे नेते राजू उंबरकर यांनी दिला आहे. मनसेने मेळावे, उद्घाटन कार्यकर्ता संमेलन चालतात, मग हिंदूंच्या सणावर बंदी का? असा सवाल उपस्थित केला आहे.

मुंबईतील दहीहंडीप्रमाणे विदर्भात पोळा साजरा करण्यासाठी मनसे आक्रमक झाली आहे. नागपूरसह विदर्भातील बऱ्याच जिल्हयात शेतकऱ्यांच्या बैलपोळा सणावर निर्बंध घालण्यात आले आहेत. येत्या सोमवारी बैलपोळा साजरा करण्यावर मनसे ठाम असल्याचे राजू उंबरकर म्हणाले आहेत.

Team Global News Marathi: