पुन्हा एकदा राष्ट्रवादीची शिवसेनेला साथ, भाजपचा केला करेक्ट कार्यक्रम

राज्यात शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला बरोबर घेऊन महाविकास आघाडी स्थापन करून शिवसेनेने भारतीय जनता पक्षाचा गेम केला होता. त्यात पुन्हा एकदा शिवसेनेनं भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले आहे.

महापालिका निवडणुकीच्या आधी होणाऱ्या वैधानिक समित्यांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी राष्ट्रवादी, समाजवादी पक्षाने शिवसेनेला साथ दिली आहे.मात्र आता काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

स्थायी समिती अध्यक्षपदासाठी नगरसेवक यशवंत जाधव यांना चौथ्यांदा रिंगण्यात उतरवण्यात आलं आहे. महत्वाच्या समित्यांवर शिवसेनेकडून आधीच्याच अध्यक्षांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेनेकडून भाजपला रोखण्यासाठी जुनी फळीच मैदानात उतरवण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षांनी अर्ज दाखल केले नाहीत. त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.

Team Global News Marathi: